Mahatma Gandhi Education Society’s
Taluka – Pathri, District – Parbhani 431506
Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded
Established in 2005
प्रवेशाचे नियम व अटी :-
१.माहिती पुस्तिका काळजी पूर्वक वाचून विदयार्थ्यांनी आपल्या हस्ताक्षरात प्रवेश फॉर्म भरून मूळ प्रमाण पत्राच्या छायांकित प्रति सह दाखल करावे विदयार्थ्यांनी मूळ प्रमाण पत्र व फीस दाखल करून आपला प्रवेश पूर्ण करावा.
२. कार्यालयात दाखल केलेले कोणतेही प्रमाण पत्र कुठल्याही परिस्थितीत परत मिळणार नाहीत म्हणून सर्व प्रमाण पत्राच्या सत्य प्रति विद्यर्थ्यांनी स्वतः कडे ठेवाव्यात.
३.आपली शाखा ऐच्छिक विषय निवडताना त्याची उपयुक्तता,आपली आवड व मागील परीक्षेत मिळालेले गुण इ.बाबींचा विचार विध्यार्थ्यानी करावा निवडलेली शाखा व विषय कदापि बदलता येणार नाही.
४.कारण न देता प्रवेश नाकारण्याचा अधिकार प्राचार्यांना कडे राहील.
५. अभ्यासक्रम सुरु झाल्या नंतर प्रवेश रद्द करावयाचा असेल तर पूर्ण वर्षाचे शुल्क भरावे लागेल.
६. डुप्लिकेट टी. सी. किंवा इतर कागद पत्र काढण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी असे कागद पत्र हरवल्याची बातमी / जाहिरातीच्या कात्रणांसह रु. १०० च्या स्टॅम्प पेपर वर मूळ कागद पत्र हरवल्याचे निवेदन करावे व शपथ पत्र समक्ष अधिकाऱ्यांसमोर पडताळून घ्यावे व कार्यालयात दाखल करावे त्याशिवाय डुप्लिकेट टी. सी. किंवा इतर कागद पत्र मिळणार नाहीत.
प्रवेशा संदर्भात महत्वाच्या सूचना ::–
१. प्रवेश अर्ज माहिती पत्रक कार्यालयातून मिळेल प्रवेश अर्ज स्वहस्ताक्षरात भरून कार्यालयात जमा करावे.
२.प्रवेश अर्जावर स्वतःचा अलीकडे काढलेला पासपोर्ट फोटो लावावा.
३. प्रवेश अर्जा सोबत पुढील कागद पत्रे जोडणे आवश्यक आहे…
अ. महाविद्यालय सोडल्याचा मूळ दाखला (टी सी.) व त्याच्या चार सत्य प्रति
ब. मराठवाड्या बाहेरील विध्यार्थ्याला मायग्रेशन प्रमाण पत्र द्यावे लागेल.
क. गुण पत्रकाच्या चार सत्य प्रति
४. अनुसूचित जाती,जमाती,विमुक्त जाती व जमाती,भटक्या जाती,विशेष मागास वर्ग,अपंग व अल्पसंख्यांकशि ष्यवृत्ती दिली जाते त्यासाठी शिष्यवृत्ती फॉर्म सोबत टी सी. व गुणपत्रकाची एक सत्य प्रत,तहसील कार्यालयाचे उत्पन्नाचे प्रमाण पत्र आणि जातीचे प्रमाण पत्र,शि ष्यवृत्ती मंजुरी क्रमांक,पासपोर्ट फोटो व जिल्हा बदली प्रमाण पत्र द्यावे.
५. शिक्षणात खंड पडला असेल तर खंड (गॅप ) प्रमाण पत्र द्यावे.
६. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना नियमानुसार प्रवेश देण्यात येईल.
Taluka – Pathri, District – Parbhani 431506
Made with ❤ by Shivam Technology Solutions | 9028121378