Skip to content

Mahatma Gandhi Education Society’s

Khan Abdul Gaffar Khan Arts College

Taluka – Pathri, District – Parbhani 431506

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded 

Established in 2005

About Us

महाविद्यालय दृष्टीक्षेपात…
महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी पाथरी या संस्थेची 1988 मध्ये स्थापना झाली ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सन २००४-५ यावर्षी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे द्वार या माध्यमातून खुले करण्यात आले आहे. आधुनिक समाजात आव्हानात्मक रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करीत आहे. या महाविद्यालयात खेळाचे साहित्य, भव्य क्रीडांगण, सुसज्ज इमारत, सांस्कृतिक कार्यक्रम, चालू घडामोडी व बहिस्थ शिक्षण अभ्यासक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे केंद्र महाविद्यालयात असून अध्ययन, अध्यापन व विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास याबाबतीत सर्व सोयींनी महाविद्यालयाचा परिसर परिपूर्ण आहे. महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखा उपलब्ध आहेत. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी संचलित खान अब्दुल गफारखान कला महाविद्यालय पाथरी हे महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रात मागील 18 वर्षापासून कार्यरत आहे महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रात योगदान देऊन सामाजिक ऋण फेडण्याचे प्रयत्न करत आहे. 21 वे शतक हे स्पर्धेचे युग आहे याची जाण ठेवून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून तो स्वावलंबी बनवा यासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी प्रयत्नशील आहेत